ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाज जागृती चे कार्य कवी करीत असतात – प्रसिद्ध कवी डॉ. ललित आधाने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा अशोक डोईफोडे

कवी हे समाज जागृतीचे कार्य करीत असतात त्या दृष्टीने कवितेने समाजाला क्रांती घडविण्यास प्रेरित केले पाहिजे असे धगधगते विचार प्रसिद्ध कवी डॉ ललित अधाने यांनी श्री वेंकटेश महाविद्यालयातील मराठी प्रा.मधुकर जाधव यांच्या कविता विशीतल्या आणि मिशीतल्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. ललित अधाने यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव,छायाराजे विजयसिंह जाधव,भाष्यकार डॉ. भगवान खरात यांची उपस्थिती होती. अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी शितल चव्हाण,पत्रकार सुषमा राऊत,मुशीरखान कोटकर, राजेश इंगळे,प्राचार्य संजय देशमुख, लक्ष्मणराव कोल्हे हे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते.या प्रसंगी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना राजे विजयसिंह जाधव यांनी प्रत्येकाने आपल्यातील प्रतिभेला न्याय दिला पाहिजे व उत्कृष्ट कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

साहित्यिक डॉ.अधाने पुढे बोलताना म्हणाले प्रा. मधुकर जाधव यांची कविता समाजातील विविध विषयांना हात घालते,भाष्यकार डॉ. भगवान खरात यांनी मनोगत व्यक्त करताना प्रा. मधुकर जाधव यांनी प्रतिमा प्रतिके वापरून एक प्रकारे व्यापक जीवनानुभव आणि तत्त्वज्ञान कमी शब्दांमध्ये कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे, असे मत व्यक्त केले. कवी प्रा. मधुकर जाधव यांनी कविता निर्मितीमागील प्रेरणा व प्रवास कथन केला. याप्रसंगी संजय देशमुख, लक्ष्मणराव कोल्हे, सौ. शितल चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी साहित्य हा ज्याप्रमाणे समाज जीवनाचा आरसा असतो त्याप्रमाणे तो त्या कवीचा सुद्धा आरसा असतो असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी चंद्रकांत खरात यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, आकाश साळवे यांना युवा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, डॉ. प्रमोद चव्हाण यांना वैद्यकीय सेवा पुरस्कार तसेच पंकज राजे जाधव यांना युवा उद्योजक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कवितासंग्रह मुद्रितशोधनाबद्दल डॉ. सुनील पवार, सुलेखनाबद्दल प्रल्हाद कायंदे तसेच रेखाटनाबद्दल प्रा. प्रशांत डोंगरदिवे यांचा सत्कार करण्यात आला.प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले यांनी तर प्रास्ताविक डॉ. सुनील पवार यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रा. सौ. मंजुषा मुळे यांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये