गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांनी सापळा रचून नाकाबंदी करत केली दारू वाहतुकीवर कारवाई

एकूण ५ लाख ८ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नमूद गुन्हयाची सविस्तर हकीकत याप्रमाणे आहे की दि. 20.08.2023 चे 12.30 ते 13.00 वा पो.हवा. कुणाल हिवसे, ब.न. 1292 यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून देवळी बस स्टँड रोड समोरील पो.स्टे. देवळी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी नाकाबंदी करून दारूबंदी संबंधाने सापळा रचून नाकाबंदी केली असता सिल्वर रंगाची मारुती सुझूकी स्विफ्ट क्रमांक एमएच-02/सीएच-3151 थांबवून झडती घेतली असता सदर वाहनांमध्ये दोन प्लास्टिक कॅन प्रत्येकी 28 लिटर प्रमाणे 56 लिटर गावठी मोह दारु प्रति लिटर 100/-रुपये प्रमाणे किंमत 5600 रुपये दोन प्लास्टिक कॅन किंमत 400/- रुपये, एक रॉयल स्टॅग कंपनीची दारूने भरलेली 750 एम.एल.ची बॉटल किंमत 2000/-रुपये व वाहन किंमत 5,00,000/-रुपये असा एकूण जुमला किंमत 5,08,000/- रुपये चा माल मिळून आल्याने आरोपी अभय जीवन चव्हाण, वय 20 वर्ष, रा. कळम माथा, जिल्हा यवतमाळ याचेविरुद्ध पोलीस स्टेषन देवळी अप. क्र. 871/2023 कलम 65(ए), 65(ई), 77(ए), 83, म.दा का. सहकलम 130, 177 मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरूल हसन साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक डॉ. श्री. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भानूदास पिदूरकर पो.स्टे. देवळी यांचे निर्देषाप्रमाणे पो.हवा. कुणाल हिवसे, पो.हवा. गणेश इंगळे, ना.पो.षि. नितीन तोडसे, विनोद कांबळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये