ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत हरविले पळविले इसम संबंधाने विशेष मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

              पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत हरविले पळविले इसम संबंधाने विशेष मोहीम राबविण्यात येत असून मोहिमेअंतर्गत पो.स्टे. ला प्रलंबीत सर्व मिसींग इसमांचा शोध घेवून त्यांना त्यांचे आप्तस्वकीयांकडे सुपूर्त करण्याचे काम करण्यात येत आहे.

सदर मोहीमेदरम्यान पो.स्टे. सेलू येथे दाखल मिसींग क्रमांक 23 / 2018 मधील सौ. शितल देवानंद गुलाबे व 28 वर्षे व त्यांची मुलगी कुमारी उत्कर्षा देवानंद गुलाबे, वय 5 वर्षे, रा. वार्ड नं. 3 झडशी, वर्धा या दोघी दिनांक 11.06.2018 पासून आपले राहते घरून हरविलेल्या असून त्यांचे वडील निरंजन गोमाजी वानखेडे, वय 54 वर्षे, रा. अमरावती यांनी त्याबाबत तक्रार दिली होती.

दाखल दिनांकापासून सदर महिला व मुलीची कोणतीही माहिती मिळून येत नसल्याने पो.स्टे. सेलू येथील शोध पथकाने अथक परीश्रम घेवून व माहिती काढून जिल्हयात व जिल्हयाचे आजूबाजूला संशयीत ठिकाणी त्यांचा शोध घेतला व दिनांक 20.08.2023 रोजी दोघांनाही मु.पो. येरणगाव तालूका नांदगाव (खंडेश्वर), जि. अमरावती येथून ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे वडीलांचे ताब्यात देण्यात आले. सदर महिला ही तिचे नांव बदलून वेगळ्या नावाने “शितल सोमा पालकर” या नावाने राहत होती.

पो.स्टे. सेलू येथे दाखल मिसींग क्रमांक 25 / 2018 मधील कू. आरती अंबादास डूकरे, वय 18 वर्षे, रा. हिंगणी तह. सेलू, जि. वर्धा या दिनांक 04.07.2018 पासून आपले राहते घरून हरविलेल्या असून त्यांचे वडील अंबादास विठोबा डूकरे, रा. वार्ड नं. 3, हिंगणी यांनी त्याबाबत तक्रार दिली होती. सदर महिलेला शोध पथकाने दिनांक 12.08.2023 रोजी हुडकेश्वर, नागपूर येथून ताब्यात घेवून तिचे वडीलांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरूल हसन साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, वर्धा डॉ. श्री. सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद के मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांचे निर्देशाप्रमाणे पो.हवा. अखिलेश गव्हाणे नापोशि सचिन वाटखेडे पो.स्टे. सेलू व पो.हवा. दिनेश बोथकर, कुलदीप टांकसाळे, ना.पो.शि. अक्षय राऊत यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये