ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होय आम्ही शिक्षक, शिक्षक झाले देवदूत

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा आदर्श

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरमाळा येठीक इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी तृप्ती देविदास घोडमारे ही आदिवासी जमाती मधील विद्यार्थिनी काही दिवस शाळेला आली नसल्याने तेथील सहाय्यक शिक्षक गणेश प्रभाकर जेनेकर यांनी तिच्याविषयी चौकशी केली असता लक्षात आले की सदर मुलीचे वडील ८ दिवसापूर्वी कॅन्सर या दुर्धर आजाराने वारले असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यामुळे ती शाळेला येत नसल्याचे समजले.त्यांनी तिच्या परिवाराला एक सामाजिक बांधिलकी म्हणून लगेच आपल्याकडील पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करून त्या मुलीची पुढील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी उचलली असून तिची सर्व जबाबदारी घेतली आहे.गणेश प्रभाकर जेनेकर हे नुकतेच दोन महिन्यापूर्वी आंतर जिल्हा बदलीने या शाळेत रुजू झाले आहेत. ते मूळचे नांदा, तह-कोरपना चे रहिवासी आहे.
शिक्षणाविषयी आवड,प्रत्येक मूल चांगले शिकले पाहिजे कोणताही विद्यार्थी गरिबीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेला नाही पाहिजे. शिक्षणानेच आपले दारिद्र दूर होते असा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.या निर्णयामुळे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, गावकरी यांनी त्यांचे खूप कौतुक केले असून परिसरात त्यांचे विशेष कौतुक केले असून निश्चितच ही बाब सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे.व कौतुकास पात्रही आहे यामधून समाजाने बोध घेणे ही काळाची गरज आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये