ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे जागतिक जैवइंधन दिवस साजरा

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांची साथ लाभली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे दि.१०ऑगस्ट ,२०२३ या दिवशी “जागतिक जैवइंधन दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ प्रदीप माकडे (A.C.S कॉलेज मारेगाव)हे होते. त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की जैविक इंधन ही काळाची गरज आहे.

पुढे बोलताना ते महणाले की परंपरागत इंधनचा साठा सीमित असल्यामुळे तो कधी ना कधी संपणार आहे. महणुन आपल्या देशाने कच्चा तेलाची आयात कमी करावी व देशातील शेतकऱ्यानी फक्त परंपरागत शेती न करता सूर्यफूल,मक्का, ऊस, सोयाबीन,मोहरी स्विच गवत अश्या विविध वनस्पती ज्यापासून जैविक इंधन मिळतो अश्या वनस्पतीची त्यांनी शेतामध्ये लागवड करावी. ज्यामुळे रोजगार निर्मिती होईल.अशे अमूल्य माहिती त्यानि विद्यार्थांना सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक देवीलाल वताखेरे यांनी केले व कार्यक्रमा मागचं हेतू स्पष्ट करीत जैवइंधन हे वातावरणातील प्रदूषण कमी करण्यात मदत करतो अशे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.स्मिता राऊत व आभार डॉ सचिन चौधरी यांनी मानले.

कार्यक्रमाचे आयोजन माननीय प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी रामचंद्र सातक,नरेश अलाम यांची साथ लाभली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये