कोरपना नगरीत शिवसेना तर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोलमजूर व कामगारांना दिवाळी शिधावाटप
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोरपणा नगरीत शिवसेना शाखेतर्फे१७ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ भाई शिंदे यांच्या संकल्पनेतून व जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना तालुका प्रमुख राकेश राठोड यांच्या वतीने परिसरातील मोलमजूर, कामगार व गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिधावाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत कष्टकरी आणि गरजू नागरिकांच्या सणात आनंद निर्माण करण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राकेश राठोड, दिनेश राठोड, किशोर झाडे, शांताराम देरकर, बाळू तुराणकर, गिरीश कोराम, मुरली गोतावडे, नानासाहेब सौदागर, विलास झाडे, चरण झाडे, रामचंद्र कातरकर, प्रल्हाद शिंदे व संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करून सामाजिक व जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करत शिवसेना शाखा कार्यालयात गरजू कष्टकरी बांधवांना मदतीचा हात देण्यात आल्याने या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.



