ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक : एकीकडे ‘मानवी शीर’ तर दुसरीकडे ‘विनाशिर धड’

धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; पोलिसांचा कसून तापा सुरु 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ शहराच्या मध्यवर्ती गजबजलेल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातील पुतळ्याजवळ सकाळच्या सुमारास मानवी शीर आढळून आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अतिव्यस्त आणि गजबजलेल्या परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,प्रियदर्शनी इंदिरा चौक परिसरात एका पुरुषाचे कापलेले शीर आढळून आले, तर दुसरीकडे रेल्वे उड्डाणपुलाखाली जाहिरातींच्या फलकाजवळ त्याचे धड आढळून आले आहे.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, रेल्वे उड्डाणपुलाखाली पडक्या होर्डिंगजवळ विनाशिराचे धड आढळून आले आहे.

माहितीनुसार मृतदेह १ ते २ दिवस जुना असल्याची माहिती असून चेहरा विद्रूप झाल्याने मृतकाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे. सापडलेले शीर आणि हे धड एकाच व्यक्तीचे असल्याची खात्री पोलीस करीत आहे.

सदर व्यक्ती नेमकी कोण आहे? शहराच्या मध्यवर्ती भागात मानवी शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे? असीे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्व दिशेने रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेकडून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविणे, घटनेमागील कारण शोधणे आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

शहराच्या भरचौकात अशा प्रकारे शीर आढळल्याने नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये