ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची भद्रावतीत कारवाई : दोन ब्रास रेतीसह २०.१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती चोरिची वाहतूक करणारा टाटा हाफटन टिप्पर जप्त केला. या कारवाईत दोन ब्रास रेतीसह एकूण २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दि. १८ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला भद्रावती परिसरात गौण खनिजाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून टाटा हाफटन टिप्पर (क्रमांक MH 34 BZ 9750) ताब्यात घेतला.

याप्रकरणी ऋषिकेश बंडू गोरे वय २९, रा. खापरी वॉर्ड, शारदा माता मंदिर परिसर, भद्रावती याच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात १०७६/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४८(७), ४८(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या टिप्परची किंमत अंदाजे २० लाख रुपये, तर दोन ब्रास रेतीची किंमत १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये