ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

पूर्ण दिवस न्यायालयाचे कामकाज बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा :_ न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पोंभुर्णा येथील न्यायालयाकडून पाठिंबा दर्शविण्यात आल्याने बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) न्यायालयाचे कामकाज पूर्ण दिवस बंद राहिले. त्यामुळे न्यायालयात विविध कामांसाठी आलेल्या पक्षकार, वकील आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपाला पाठिंबा दर्शविण्यात आला. या संपामुळे दिवसभर न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले. अनेक प्रकरणांच्या सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांना कामकाज बंद असल्याने परतावे लागले.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये