ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषीमंत्र्यांचे चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या समस्यावर सकारात्मक निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नातून कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या दालनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आयुक्त कृषी विभाग पुणे प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई प्रकल्प संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प पुणे तसेच अप्पर प्रधान सचिव परिमल सिंग यांच्या उपस्थितीत शेतकरी उत्पादक कंपनीच्या अकृषक जमिनीच्या अटी शिथिल करण्याकरिता मुद्दत वाढ सुलभ पद्धतीने शासन धोरणानुसार ग्रामीण भागात अकृषक धोरण राबविणार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकत प्रमाणपत्र साठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रकल्प संचालक यांची दर दोन महिन्यांनी मीटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल शेतकरी उत्पादक कंपनीने उपप्रकल्पात विद्युत जोडणी करिता अल्प निधी मंजूर झाल्याने अनेक शेतकरी उत्पादक कंपनीला अनुदान प्राप्त झालेले नाही व मंजूर निधीपेक्षा अधिक खर्च करून विद्युत जोडणी करण्यात आली.

यामध्ये टप्पा दोन व तीन मधील शेतकरी उत्पादक कंपनी ना उपप्रकल्प मंजूर झाले यांना निधी उपलब्ध करून देण्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले खनिज विकास निधी प्रतिष्ठान मध्ये जिल्हा स्तरावर मा पालकमंत्री तसेच स्थानिक आमदार जिल्हाधिकारी यांना खनिज निधितून वार्षीक प्राप्त होणाऱ्या निधितून कृषी विभागाला राखीव निधि अंतर्गत शेतकऱ्यांना प्रदूषणामुळे होणारे नुकसान वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक लाभासाठी शेती उपयोगी साहित्य अवजारे बँक तारेचे कुंपण तारेची जाडी झटका मशीन स्प्रिंकलर संच पावर स्प्रे पंप ऑइल इंजन मोटर पंप संच गोदाम बांधकाम इत्यादी योजना 90% अनुदानावर राबविण्यात यावे एफ पी सीची मूल्यवर्धन साखळी बळकट करण्यासाठी वर्किंग कॅपिटल उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून जिल्हास्तरावर सकारात्मक पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल यावर आमदार देवराव भोंगळे यांनी भर दिला हा भाग आदिवासी व जंगल व्याप्त असल्याने यामध्ये शेतकऱ्यांकरिता निधी देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा व प्रयत्न करावा यावर प्रधान सचिव परिमल सिंग यांनी याबाबत आवश्यक ते पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच पंजाबराव देशमुख जैविक मिशन हे राष्ट्रीय सेंद्रिय शेती व जैविक मिशन कार्यालय अकोला वरून पुणे येथे स्थलांतर झाल्यामुळे विदर्भातील व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला अन्याय झाला आहे व अंतर जास्तअसल्याने तसेच हवामान बदल यामुळे शेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी राष्ट्रीय सेंद्रिय शेती प्रकल्प जैविक शेती मिशन अकोला किंवा नागपूर येथे कार्यालय ठेवण्यात यावे यावर मंत्री महोदयांनी विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय होणार नाही.

यासाठी आवश्यक ते धोरण निश्चित करून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असे आस्वत केले त्याचबरोबर नानाजी देशमुख नव संजीवनी योजना पोखरा एकच्या धर्तीवर राबवण्याबद्दल व्यापक चर्चा करण्यात आली यावरमंत्री महोदय यांनी प्रकल्प संचालक मीनल करणवाल यांना याबाबत सविस्तर टिप्पणी तयार करून जागतिक बँकेचा हा प्रकल्प शेतकरी हिताचा असल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी व अटी शर्ती शिथिल करून अवजारे बँक तसेच सध्याची दर सूचीवर आधारित तसेच टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी व लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे टप्पा दोन निवड झालेल्या जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी अटी शर्ती शिथिल करण्याचे व यामध्ये योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मंत्री दत्तात्रय जी भरणे व प्रकल्प संचालक मीनल करणवाल यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले.

यामध्ये यावेळी चंद्रपूर जिल्हा शेतकरी उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष आबिद अली यांनी येणाऱ्या अडचणी बद्दल अवगत करून दिले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बंडू डाकरे लक्ष्मण घुगुल संतोष बाजीराव वल्का दत्ता कांबळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते आमदार देवराव भोंगळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी बाबत व मूल्यवर्धन साखळी विकसित करण्यासाठी बळकटरीकरण करण्याची आवश्यकता यावर भर दिला यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाने दखल घेत सकारात्मक प्रतिसाददिल्याने जिल्ह्यामध्ये भविष्यात योजना प्रभावीपणे राबवल्या जाण्याची आशा बडकावली आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये