ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ASDD प्रवर्गातील मतदारांना अंतिम यादीत नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी

बीएलओमार्फत संपर्क साधून मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांना गणना प्रपत्रे वितरित करण्यात आली होती, मात्र त्यांची नावे ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) या प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांना आता अंतिम मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने अशा मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, ७० राजुरा विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार कोरपना यांच्या कार्यालयाकडून १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

कोरपना तालुक्यातील सर्व पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपले नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कोरपना सोनाली तटगुरे यांनी केले आहे.

मतदारांनी वेळीच आपल्या संबंधित बीएलओशी संपर्क साधून मतदार यादीतील नावाची खात्री करावी, असेही प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये