ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्तावरील दुचाकी वाहनाला फटाके बांधून फोडणारे तसेच घरामध्ये फटाके फोडून त्रास देणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध प्रशासन व्दारे दखलपात्र गुन्हे नोंद

पोलीस स्टेशन वर्धा शहर व पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हे दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिवाळी सण संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येत असतो पंरतु दिवाळी सणाच्या निमित्ताने घरी दिवे आणि फटाके फोडले जात असते परंतु फटाके फोडले जात असताना नागरिकांना या गोष्टी किती त्रास भोगावा लागत असतो आणि लोकांना कधी आपले हातपाय जाळून घ्यावे लागत असतात या करीता मा. सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्रीय सरकारने व महाराष्ट्र राज्य सरकारने अगदी कडक नियम लागू करुन नागरिकांना आवाहन सुध्दा करण्यात आले होते आणि वृत्तपत्रा व्दारे माहिती सुद्धा देण्यात आली असून तरी नागरिकांनी रस्ता वरिल दुचाकी वाहनांना फटाके बांधून फटाके फोडण्यात आले आहेत आणि या गोष्टींचा त्रास लोकांना सहन करावा लागला आहे आणि घराबाहेर फटाके न फोडून घरांच्या आतमध्ये फटाके फोडले जात आहे.

याकरिता पोलीस स्टेशन रामनगर वर्धा आणि पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा व अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा आणि गृह पोलीस अधीक्षक प्रमोद महेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील ठाणेदार नागेशकुमार चतरकर व पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये