ऑटोरिक्षा चालक नामे नितीन कडव यांनी अज्ञात महिला प्रवासीची 30 हजार रुपये बॅग पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे केली परत
पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर आणि पोलीस कर्मचारी यांनी ऑटोरिक्षा चालक यांचे अभिनंदन करुन कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 15 नोव्हेंबर 2026 रोजी ऑटोरिक्षा चालक नामे नितीन मधुकरराव कडव राहणार बोरगाव मेघे हे वर्धा बस स्टॅंड ते बोरगाव मेघे येथे ऑटोरिक्षा चालवून आपल्या परिवारातील उदरनिर्वाह करित असतात आज दिनांक रोजी त्यांचे ऑटोरिक्षा मध्ये काही महिला प्रवासी बसून बोरगाव मेघे पर्यंत गेले आहेत आणि तिथून नजर चुकीने त्यांची एक बॅग ऑटो मध्ये राहिली ऑटो चालक नितीन कडव यांनी त्यांना शोधायचा प्रयत्न केला.
परंतु ते प्रवासी मिळून न आल्याने प्रामाणिक पणाने ती बॅग पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आणून जमा केली त्या बॅग मध्ये सामानासह 30,000/- रुपये रोख रक्कम सुध्दा मिळून आल्याने ती बॅग पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे जमा करण्यात आली आहे व ऑटोरिक्षा चालक नामे नितीन मधुकरराव कडव यांनी केलेली प्रामुख्याने प्रामाणिक कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर पोलीस स्टेशन वर्धा शहर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश गांवडे पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी व पोलीस स्टेशन वर्धा शहर तर्फे नितीन मधुकरराव कडव यांचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले आहे.



