जिल्हा घटकात मिशन झिरो अॅक्सीडेन्ट, वर्धा जिल्हा अभियान
नागरीकांच्या सुरक्षित्तेसाठी वाहतूकीस शिस्त निर्माण करणे हा मोहिमेचा उद्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शना मा. ठाणेदार सा. अनिल राऊत पो. स्टे हिंगणघाट तसेच वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार घुले व पोलीस अंमलदार वर्धा जिल्हा घटकात मिशन झिरो अॅक्सीडेन्ट, वर्धा जिल्हा अभियान राबविण्यात येत असुन आज दि. 02/11/2026 रोजी हिंगणघाट येथे विशेष मोहिम राबविण्यात आली. नागरीकांना व वाहन चालकांना त्यांचा अपघात होणार नाही याबाबत आपले वाहन सुव्यवस्थित हेल्मेट व सिटबेल्ट वापरणे, वेगमर्यादेचे पालण करणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापरव मद्यपान टाळणे, वाहनाचे कागदपत्रे अद्यवत ठेवणे आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास न देणे याबाबत जनजागृती करण्यात आली. नागरीकांनी सार्वजनिक रस्त्यावर किंवा नो पार्किंग क्षेत्राात कीने उभी करू नये. रूग्नवाहिका व अपातकालीन वाहनांना मार्ग दयावा. आणि वाहतूकीची शिस्त राखावी असे आवाहण करण्यात आले. मोहीमेचा उद्देश हि मोहिम केवळ दंडात्मक कार्यवाहीपुर्ती मर्यादीत नसुन नियमभंगाला आळा घालणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरीकांच्या सुरक्षित्तेसाठी वाहतूकीस शिस्त निर्माण करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. ठळक कार्यवाही.
मोहिमे दरम्याण मोटार वाहन कायदया नुसार वाहतूक नियमाचे उल्लघंन करणा-या वाहन चालकाविरूध्द एकुण 170 कारवाया करण्यात आल्या आहे.
नियमभंग करणा-या वाहन चालकावर या पुढे नियानुसार कारवाई सुरू राहणार आहे. नागरीकांनी स्वयंस्फुतीने वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित व सुरळीत वाहतूकीस सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीले करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा आणि सुरक्षित प्रवास करा.
सदर मोटार वाहन कायद्यांन्वये करण्यात येणारे कारवाईचा उद्देश हा दंडवसुल करण्याचा नसुन वाहन चालकांना शिस्त लावण्याकरीता तसेच सर्व नागरीकांचे सुरक्षित प्रवासाकरीता असुन नागरीकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधाण्या देण्यात येत आहे. लहान मुलांन कडून विना परवाना वाहन चालकवुन घडत असलेले अपघात व त्यामुळे त्यांचे भविष्यावर होणारे वाईट परीणामापासुन त्यांचे संरक्षण व नागरीकांचे जिवीताचे संरक्षण हा प्रमुख उद्देश झिरो अॅक्सीडेन्ट मिशन वर्धा जिल्हा अभियानाचा आहे.
यापुढे सदर झिरो अॅक्सीडेन्ट मिशन वर्धा जिल्हा सर्व जिल्हाभर प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे. तरी वधार जिल्हा वाहतूक पोलीस विभागागकडून जिल्हयातील सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येत आहे कि आपले वाहन चालवितांना वाहतूक नियमाचे पालन करावे.



