देवळी येथे किरकोळ कारणावरून ४२ वर्षीय इसमाचा चाकूने वार करून खून
देवळी पोलिसांची तत्पर कारवाई, अवघ्या एका तासात चार मुख्य आरोपी अटक व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : देवळी शहरातील इंदिरानगर परिसरात किरकोळ कारणावरून एका ४२ वर्षीय इसमाचा चाकूने वार करून खून केल्याची गंभीर घटना दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ०१.०० वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांच्या तत्पर व प्रभावी कारवाईमुळे घटनेनंतर अवघ्या एका तासाच्या आत गुन्ह्यातील चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनेची हकीकत : मृतक गजानन किशोर पाटणकर (वय ४२ वर्षे, रा. देवळी) व आरोपी यांच्यामध्ये मोहित धाबा येथे सिगारेट पिण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. सदर किरकोळ कारणावरून आरोपींनी संगनमताने गैरकायद्याची मंडळी जमविली.
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे मृतक हा आपल्या मित्राला सोडण्यासाठी इंदिरानगर, देवळी येथे गेला असता आरोपींनी त्याच्या वाहनास आडवे येऊन त्यास अडविले. यावेळी आरोपींनी मृतकास पकडून ठेवून त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने गजानन पाटणकर यांचा मृत्यू झाला.
देवळी पोलिसांची तत्पर कारवाई :
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देवळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून घटनेनंतर अवघ्या एका तासाच्या आत गुन्ह्यातील चार मुख्य आरोपींना अटक केली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळावरील भौतिक व वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यासाठी तात्काळ फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व तपासाबाबत आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या.
अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी :
१) अमन संतोष टेकाम, रा. देवळी.
२) ओम रमेश सावरकर, रा. देवळी.
३) प्रणय ज्ञानेश्वर राठोड, रा. देवळी.
४) मनोज ज्ञानेश्वर राठोड, रा. देवळी.
विधीसंघर्षग्रस्त बालक : १ (नाव गोपनीय).
गुन्ह्याचा तपशील :
पोलीस स्टेशन : देवळी, जि. वर्धा.
अपराध क्रमांक : ८२५/२०२६.
– कलमे : १०३(३), १२६, ६१(२)(अ), २९६, १८९(२)(४), १९०, १९१(१)(२)(३) भारतीय न्याय संहिता २०२३.
फिर्यादी : विक्की किशोर पाटणकर, रा. देवळी.
– मृतक : गजानन किशोर पाटणकर, वय ४२ वर्षे, रा. देवळी.
– घटनास्थळ : इंदिरानगर, देवळी.
कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी :
सदरची संपूर्ण कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील श्री. प्रमोद मकेश्वर सर व उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्रीमती वंदना कारखेले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक कमलेश मगरे व देवळी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत तत्परतेने व कौशल्यपूर्ण पद्धतीने करत आहे.
घटनेनंतर अल्पावधीत चार मुख्य आरोपींना अटक करून एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेणे, तसेच घटनास्थळावर तात्काळ फॉरेन्सिक पथकाकडून वैज्ञानिक पुरावे संकलित करण्याची कार्यवाही करणे, यामुळे देवळी पोलिसांनी गुन्हे तपासातील तत्परता व व्यावसायिक दक्षता दाखवून दिली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
देवळी पोलीस स्टेशन, जि. वर्धा



