(BSP)चे कार्यकते श्री बंड्ड कुळमेथे व माझी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच सौ शशिकलाबाई कुळमथे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा : कोरपणा परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची ओळख असलेल्या श्री बडु कुळमेथे शशिकलाबाई कुळमेथे यांनी १ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे कोरपणा परिसरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बडु कुळमेथे सौ शशिकलाबाई कुळमेथे यांचा राजकीय प्रवास बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सुरू झाला होता. बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपद भूषविले, तसेच सरपंचपदाची जबाबदारीही कोरपणा ग्रामपंचायत सांभाळली. एवढेच नव्हे तर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतही आपले नशीब आजमावले. त्यामुळे त्यांना राजकीय आणि सामाजिक कार्याचा चांगला अनुभव आहे.
या संपूर्ण प्रवासात त्यांचे पती बंडू कुळमथे यांचेही मोलाचे योगदान राहिले आहे. बंडू कुळमथे यांनी स्वतःच्या समाजासोबतच इतर समाजातील नागरिकांमध्येही आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते निर्माण केले. गोरगरीब, गरजू आणि अन्यायग्रस्त नागरिकांना मदत करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक गरजू कुटुंबांना त्या काळात मोठा आधार मिळाला.
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी अमोल आसेकर, किशोर बावणे, सुनील बावणे, विनोद कुमरे, अरुण मडावी, अब्राल अली, विठ्ठल तुमराम, विजय जीवने, धनराज कोहचाडे विशाल गजलवार, उमेश पालीवार, आणि मोहब्बत खान ,यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टीपासून सुरू झालेला राजकीय प्रवास आणि आता भारतीय जनता पार्टीत केलेला जाहीर प्रवेश हा बडु कुळमेथे व शशिकलाबाई कुळमथे यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सामाजिक बांधिलकीचा वारसा, जनतेशी असलेली नाळ आणि राजकीय अनुभव यांच्या जोरावर त्यांची पुढील वाटचाल कशी राहते, याकडे कोरपणा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राजकारण बदलले तरी जनसेवेचा संकल्प कायम राहील असे यावेळी बंडू कुडमेथे सौ शशिकलाबाई कुळमेथे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले यांच्या भाजप प्रवेशाने कोरपण्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू!



