ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प व शपथ ग्रहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग, शिक्षण संचालक पुणे यांच्या दिनांक 01/11/2026 रोजीच्या पत्र तथा मार्गदर्शक सूचनांनुसार आणि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आज मंगळवार, दिनांक 03/11/2026 रोजी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे “प्रदूषणमुक्त दिवाळी” साजरी करण्याचा संकल्प व शपथ ग्रहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

कनिष्ठ महाविद्यालयीन विभाग प्रमुख प्रा. दिनकर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कला सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेश बोळे यांच्या सोबत वरील शपथ घेण्याचा उपक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फटाके न वाजवण्याची घेतली शपथ

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली. “दिवाळी हा आनंद उत्सव आहे, हा आनंद साजरा करताना पर्यावरणाला व सजीवांना त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. यावर्षी दिवाळीत फटाके वाजवणार नाही आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करू,” असा दृढ संकल्प विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी केला. फटाक्यांमुळे होणारे हवा व ध्वनी प्रदूषण मानवी आरोग्यासह लहान मुले, वृद्ध, रुग्ण आणि मुक प्राण्यांसाठी कसे घातक ठरतात, याची जाणीव यावेळी करून देण्यात आली.

सक्षम सहकार्य

हा शासकीय उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. अशोक सातारकर, प्रा. नितीन सुरपाम, प्रा. अनिल मेहरकुरे, प्रा. कु. सोज्वल ताकसांडे, प्रा. कु. शिल्पा कोल्हे, प्रा. डफाडे, तसेच प्रयोगशाळा सहायक श्री. करण लोणारे, शशिकांत भाऊ आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये