ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर ते वादग्रस्त पोलिस पाटील पद रद्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना राजुरा आणि जिवती येथील पोलिस पाटील पद भरती प्रक्रिया पार पडली.त्यात जिवती तालुक्यातील गुडशेला येथे तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील मुलाखतीस पात्र उमेदवार अनिता रमेश कोडापे ह्या बाहेर गावच्या म्हणजेच मौजा भोलापठार ता.जिवती चे रहिवाशी असून त्यांनी खोटे कागद पत्र सादर करून हा अर्ज दाखल केला होता.

त्या अर्जावर आक्षेप घेत त्यांची योग्य तपासणी करून पद भरती करण्यात यावी अशी तक्रार दुसरे उमेदवार रितु संतोष कोडापे यांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी,राजुरा यांचे कडे केली होती. आणि अनिता रमेश कोडापे यांचे गुडशेला रहिवाशी नसल्याचे सबळ पुरावे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करून ती या गावचे नाही हे सिद्ध केले असून हे पद अपात्र झाल्याचे उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये