वेकोलिमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट
घुग्घुस : दि. ३१ मार्च २०२५ रोजी वेकोलि वणी क्षेत्रातील बेलोरा नायगाव डीप कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या खाणीत ३५ वर्षे ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेल्या समीउद्दीन शेख यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी त्यांचा सन्मान करण्यात आला.
समीउद्दीन शेख हे त्यांचा मनमिळावू स्वभाव, सामाजिक कार्यांमधील सक्रियता आणि जातिभेदापासून दूर राहून सर्व समाजासोबत मिळून मिसळून राहण्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांना दिल्लीत तालकटोरा येथे महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी १० मे १९८९ रोजी वेकोलि वणी निलजई कोळसा खाणीत आपल्या वडिलांच्या अनफिट झाल्यानंतर कार्यभार स्वीकारला होता आणि ३१ मार्च २०२५ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
या प्रसंगी आयोजित सत्कार सोहळ्यात बेलोरा नायगाव डीप कोळसा खाणीचे सेफ्टी ऑफिसर अनिल बोंडे, सहाय्यक प्रबंधक रमाकांत शर्मा, प्रबंधक जुमडे, एससी, एसटी, कांसील आणि सिस्टाचे ए.डी. मेश्राम, आयटक युनियनचे रवि डिकोडा, एच.एम.एस. युनियनचे शरद ठाकरे, बी.एम.एस. युनियनचे पी.एन. वंजारी तसेच विविध युनियनचे पदाधिकारी व कोळसा खाणीतील कर्मचारी उपस्थित होते.
समारंभात समीउद्दीन शेख यांचा सन्मान शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मिठाई देऊन करण्यात आला. तसेच, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखमय जीवनासाठी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन जांभुळकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन ए.डी. मेश्राम यांनी व्यक्त केले.