ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्हॉईस ऑफ मीडियाची भद्रावती तालुका कार्यकारणी गठीत

तालुका अध्यक्षपदी बबलू राय तर तालुका सचिवपदी दिलीप मांढरे यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           दि. ४ ऑक्टोबर २०२६ : व्हॉईस ऑफ मीडिया भद्रावती तालुका कार्यकारणीची सन २०२६ ते २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्षपदी श्री. बबलू राय, तर तालुका सचिवपदी श्री. दिलीप मांढरे यांची निवड करण्यात आली.

भद्रावती तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडियाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वृंदावन सभागृह येथे वरिष्ठ पत्रकार व सेवानिवृत्त शिक्षक श्री. विवेक सरपटवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीमध्ये पत्रकार बांधवांच्या विविध समस्या, संघटनात्मक विषय, आगामी उपक्रम तसेच पत्रकारांच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर पुढील दोन वर्षांसाठी नवीन तालुका कार्यकारणीची निवड पुढील प्रमाण करण्यात आली. यात बबलू राय – तालुका अध्यक्ष, दिलीप ठेंगे – तालुका कार्याध्यक्ष, दिलीप मांढरे – तालुका सचिव, रवी भोगे – तालुका उपाध्यक्ष, विनायक येसेकर – तालुका उपाध्यक्ष, जावेद शेख – तालुका सहसचिव, लिमेश माणुसमारे – तालुका कार्यवाहक, चैतन्य कोहळे – तालुका प्रसिद्धी प्रमुख, अतुल कोल्हे – तालुका संघटक, विवेक सरपटवार – तालुका कोषाध्यक्ष, रवी कुड़ुदुला – तालुका सदस्य, सुरेंद्र चौहान – तालुका सदस्य, विजेंद्र वानखेड़े – सदस्य, किसन रावडे – सदस्य, राजू गैनवार – सदस्य, संदीप जीवने – सदस्य, अब्बास अजानी – सदस्य, निलेश नवराते – सदस्य, उमेश कांबळे – सदस्य, अनिल इंगोले – सदस्य, किशोरीकांत चौधरी – सदस्य, राजेश रेवते – सदस्य, संदीप जीवन – सदस्य यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारणीचे पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले असून, आगामी काळात पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये