ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयास ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे शैक्षणिक सत्र 2025-26 करिता महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूरला ‘*उत्कृष्ट महाविद्यालय’ 2025-26* पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त 2 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कवळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेकर, LIT विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल लोंढे, LIT चे कुलसचिव डॉ. नीरज खटी, जिल्हाधिकारी श्री. अविनाश पांडा, विद्याशाखांचे सदस्य तसेच व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, GSPMचे सचिव मा. श्री. धनंजयजी गोरे, उपाध्यक्ष श्री. विठ्ठलराव थिपे, सदस्य श्री. रामचंद्र सोनपितरे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थिकेंद्रित उपक्रम, विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्यक्रम, संशोधन, सामाजिक बांधिलकी तसेच महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूरच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हा पुरस्कार महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून, पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये