ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथे रिपाइं संघटन वर्धापनदिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तारीख ३ ऑक्टोबर २०२६ ला सिद्धार्थ बुद्ध विहार, एसटी वर्कशॉपजवळ तुकूम चंद्रपूर येथे रिपब्लिकन संघटन वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आले.

सभेचे अध्यक्ष गोपाल रायपुरे महाराष्ट्र प्रदेश चिटणिस हे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यांत आली.

रिपब्लिकन पार्टीत कार्यकर्त्यांची आलेली उदासीनता झटकून एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गोपाळ रायपूरे यांनी केले.

माजी जिल्हाध्यक्ष तथा नागपूर प्रदेश उपाध्यक्ष यांनी रिपब्लिकन पार्टी स्थापना दिवसाचे महत्व स्पष्पट केले. रिपब्लिकन पार्टीची एकसंघ संघटनशक्ती निर्माण करायची असेल तर सुरूवातीपासून रिपब्लिकन पार्टीच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेल्या समता सैनिक दलाला सोबत घेऊन आपणाला संघटनशक्ती वाढविणे गरजेचे असल्याचे रिपाइंचे महाराष्ट्र राज्य चिटणिस अशोककुमार उमरे यांनी सांगितले. अजय चव्हाण रिपाइं चंद्रपुर जिला उपाध्यक्ष यांनी आपले विचार निरंतर प्रचार प्रसार करत रहावे. प्रत्येक तालुक्यात मिटिंग घेवून पार्टीचे कार्य निरंतर करण्याबाबत विचार व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष कोमल रामटेके यांनी जिल्ह्यात नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीत व्यापक बदल घडवून आणण्यावर भर दिला.

 उमेश गौतम युपी गडचांदूर यांनी हम बाबासाहब के अनुयायी है। हमे रिपाइं का कार्य अच्छा लगा। हम बाबाहसाहब के मुल संगठन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को आगे बढ़ाने के लिए सदोदित सहकार्य करते रहेंगे। रिपाइंचे कार्य एक कार्यकर्ता म्हणून आम्ही कार्य करू नवयुवकांना जोडून कामाला लावावे असे सूचविले. रिपाइं चे कार्य करण्याकरिता आपण कमी पडत आहोत.आमचे नेहमी सहकार्य राहिल असे दिनेश गायकवाड हरदोना खुर्द यांनी सांगितले.

सतिश रामटेके सचिव विहार समिती म्हणाले की रिपब्लिकन ही विचारधारा आहे. डॉ आंबेडकर म्हणाले की या देशातील लोग देश व रिपब्लिकन ही संकल्पना धोक्यात आणतील. रिपाइं जनतेनी आई प्रमाणे जपणूक करावी. सदस्या कडून मासिक फंड जमा करून पक्षाचे काम अन्य जनते करिता करावे. पेड वर्कर तयार करने. पक्षाचे अंतर्गत सुधारणा करावी. जनतेतील गैरसमज दूर करावा. रिपब्लिकन पार्टी चे संविधान नुसार कार्य करावेत.

पक्षातर्फे वरचेवर कार्यक्रम बैठकीचे आयोजन होत राहावे. अन्य आंबेडकरी पक्षाशी संगणमत करून निवेदन द्यावे. विहारातील लोकांना पार्टी ची माहिती देने. अन्य आंबेडकरी विचाराचे पदाधिकारीशी एकत्र येण्याविषयी चर्चा करने या विषयावर सुद्धा उपस्थित कार्यकर्ते यांनी भर दिला.

तसेच 15,16 ऑक्टोबर २०२६ ला चंद्रपूर दीक्षाभुमीवर स्टाल लावने खर्च मंडप, लाईट, बैनर फुल हार इत्यादी अंदाजे 10000 चे वर खर्च अपेक्षित असून प्रत्येकांनी 500रू. किंवा प्रत्येक तालुक्यातून 2500 रूपये द्यावे असे आवाहन करण्यात आले. दीक्षाभूमीवर पक्षातर्फे पक्षाच्या धेय्य, उद्दिष्टे आणि धोरणे याचे पत्रके प्रचार करने पक्षाचे कार्य निरंतर करत राहने . राजकीय हित संबंध जोपासने. समस्यांचे निवेदन देवून फालोअप घेणे, प्रसिद्धी माध्यम तयार करणे. तसेच पक्षाने सामाजिक समस्या सूद्धा हाताळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

गुरूदास रामटेके कोषाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा , मा. वाघमारे साहेब उपाध्यक्ष विहार समिती,मारोतराव रायपुरे विहार अध्यक्ष सतिश रामटेके विहार सचिव, वाघमारे साहेब विहार सचिव, जनार्धन वाघमारे, दिनेश गायकवाड, उमेश गौतम,युपी, सतीश रामटेके, एस. बी. रायपूरे,पोर्णिमा अशोककुमार, दयाल वाळके गुरूजी, बी. एस. वाघमारे, देविदास दुर्गे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस प्रा. रविंद्रनाथ पाटील यांनी आणि आभार प्रदर्शन पोर्णिमा अशोककुमार यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये