ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर

नवमतदारांसह महिला व दिव्यांग नागरिकांना नोंदणीची संधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत जिवती तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

      विशेष शिबिरे १९ व २० सप्टेंबर तसेच २६ व २७ सप्टेंबर २०२६ या चार दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. विशेषतः नवमतदार, महिला आणि दिव्यांग मतदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

       विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दावे व हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील सर्व पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन मतदार म्हणून आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन ७०-राजुरा विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिवतीच्या तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये