ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदुर येथे बेटी बचाव, बेटी पढाव व सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या अंतर्गत बेटी बचाव, बेटी पढाव व सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महिलांचे संरक्षण, मुला-मुलींची बालविवाहातून सुटका, मुलींचे शिक्षण, हुंडाबंदी व बालविवाह प्रतिबंध तसेच शासनाच्या विविध महिला व बालकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स , गडचांदूर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी भूषविले कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देव सर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कु. मनीषा पाचभाई, परिविक्षा अधिकारी श्री.अतिश कुमार चव्हाण, परिविक्षा अधिकारी कुमारी सायली पाटील, तालुका संरक्षण अधिकारी श्री.प्रदीप भोंगळे, समुपदेशक कु. प्रिया पिंपळशेंडे, मनीषा देठे, केस वर्कर कल्पना फुलझले तसेच बालविकास प्रकल्प कार्यालय, पंचायत समिती कोरपना प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, बालविवाहाचे दुष्परिणाम, हुंडा प्रथा प्रतिबंध, बालकांचे संरक्षण तसेच महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. समाजात मुलगा-मुलगी समानतेची भावना निर्माण करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांविरोधात जनजागृती करणे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

महिला व बालकांचे संरक्षण, मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे, असा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या संदेशाचा व्यापक प्रसार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये