ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहन काही मिनिटांसाठीच उभे आहे या कारणांमुळे रस्तावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकवर वाहतूक विभागाची धडक कारवाई

सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा व सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांचे आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहरात व वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस स्टेशन रामनगर पोलीस निरीक्षक श्रीमती पोर्णिमा राखुंडे जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार घुले शहर वाहतूक शाखा स्टाप तसेच पोलीस स्टेशन स्टाप शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच वाहनचालक व पादचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा यांच्याकडून रस्तावर वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केलेल्या वाहनावरील विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान सार्वजनिक रस्तावर अशा पद्धतीने वाहने उभी करणा-या वाहन चालक विरुद्ध मोटार वाहन अधिनियम1988 चे कलम 122 अन्वये एकुण 184 केसेस व दंड 99,500/- रुपये तसेच ट्रिपल सिट वाहन चालकांवर एकुण 24 केसेस व दंड 24,000/- रुपये वाहनांचे कागदपत्र जवळ न बाळगणे व फ्रंट सिट वाहन चालविणे मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरून चालविणे अशा एकूण 477 केसेस व दंड 4,37,350/- रुपये करण्यात आला तसेच आवश्यकतेनुसार वाहतूकीस अडथळा ठरणारी वाहने हटविण्याची कारवाई करण्यात आली व नागरिकांना सुध्दा आवाहन करण्यात आले.

वाहनचालकांनी आपले वाहन रस्तावर आडवे दुतर्फा किंवा वाहतूकीच्या प्रवासाला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करु नये विशेषतः (1)रस्ताच्या मधोमध किंवा वाहतूकीच्या मार्गात वाहन उभे करु नये(2) चौक वळण अरुंद रस्ता बसथांबा व गर्दीच्या ठिकाणी अनाधिकृत पार्किंग करु नये(3) ईतर वाहनांना जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन पार्क करु नये (4) शक्यतो निर्धारित पार्किंग च्या ठिकाणी वाहन उभे करावे (5) वाहन थांबविताना पादचारी व इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार करावा(6) वाहतूकीस अडथळा निर्माण झाल्यास आपत्कालीन वाहने रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने यांना मार्ग मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते याची जाणीव ठेवावी रस्ता हा सर्व नागरिकांच्या वापरासाठी असून प्रत्येक वाहनचालकांने वाहतूकीचे नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे माझे वाहन काही मिनिटांसाठी उभे आहे या कारणामुळे रस्तावर अडथळा निर्माण करणे योग्य नाही. वाहतूक सुरळीत सुरक्षित आणि अपघात मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि योग्य ठिकाणी पार्किंग सुरक्षित वाहतूक हा संदेश आचरणात आणावा. वाहतूक नियमांचे पालन करा. रस्ता सुरळीत ठेवा आणि स्वत:सह इतरांचा जीव सुरक्षित ठेवा.

सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार घुले वाहतूक शाखा वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये