नितीन अशोकराव गाढवे यांची गळफास घेऊन आत्महत्या
पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील पोलीस कर्मचारी करीत आहेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 17/9/2026 रोजी फिर्यादी नामे मुकुंद मनोहरराव आकोटकर राहणार जिल्हा परिषद शाळेजवळ गणेश नगर वार्ड नंबर 3 बोरगाव मेघे वर्धा यांनी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिली की फिर्यादीचा भाचा मृतक नामे नितीन अशोकराव गाढवे वय 36 वर्ष राहणार जिल्हा परिषद शाळेजवळ गणेश नगर वार्ड नंबर 3 बोरगाव मेघे वर्धा आपल्या राहते घरी बेडरूम मधील सिलिंग फॅनला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे पोलीस हवालदार विजय पंचटिके यांनी मर्ग क्रमांक 80/2026 कलम 194 बीएनएस दाखल करण्यात आला आणि यावेळी पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी प्राथमिक तपास करण्यासाठी तपास अंमलदार सहायक फौजदार नरेश गावंडे व पोलीस कर्मचारी पाठवून मृतक बॉडी काढून शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय वर्धा येथे आणण्यात आले आहे आणि पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर पोलीस करीत आहेत…



