ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ए. टी.एम. चे विड्रॉल न झाल्याचे भासवुन हाथचलाखीने फिर्यादीचे ए.टी.एम. कार्ड घेवुन फिर्यादीचे बँक खात्यामधुन पैसे काढणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेवुन अटक

एकूण जु. किमंत १ लाख ९९ हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे सौ. माधुरी अंबादास गवई, वय ३५ वर्षे, रा. पंकज कॉलनी, स्वामी समर्थ मंदीर, अमरावती ता. जि. अमरावती यांनी येवुन तक्रार दिली कि, ०२/०८/२०२६ रोजी सकाळी ०९/१० वा. चे दरम्यान अमरावती येथुन ट्रेन नी वर्धा येथे आले व जवळ पैसे नसल्याने सकाळी १०/३५ वा. सुमारास रेल्वे स्टेशन जवळील एच.डी.एफ.सी. बँकेचे ए.टी.एम. वर गेले असता आतमध्ये ०२ अनोळखी इसम आले. मी ए.टी.एम. मधुन २,०००/- रू. काढले असता त्यादरम्यान त्यापैकी एका इसमाने तुमचे ट्रान्दोक्शन पुर्ण झाले नाही व ए.टी.एम. मशीन मधुन स्लिप बाहेर आल्यानंतर ट्रान्दोक्शन पुर्ण होईल असे म्हटल्याने फिर्यादी यांनी पुन्हा ए.टी.एम. मशीनमध्ये टाकले असता काळया रंगाचे टि शर्ट घातलेल्या आरोपीने फिर्यादीची दिशाभुल करून हातचलाखीने फिर्यादीचे ए.टी.एम. कार्ड आरोपीने घेवुन दुसरे ए.टी.एम. फिर्यादी यांना देवुन निघुन गेले. काही वेळाने फिर्यादी हे दवाखान्यात जात असता फिर्यादी यांना त्यांचे युको बँक चे खात्यामधुन ०५ ट्रान्झेक्शन ने ४८,०००/- रूपये काढण्यात आल्याचा मॅसेस आल्याने फिर्यादी यांची दोन अज्ञात आरोपीतांनी दिशाभुल करून हातचलाखीने ए.टी.एम. ची अदलाबदली करून फिर्यादीचे खात्यामधुन एकुण ४८,०००/- रू. काढुन फसवणुक केल्याचे तकारी वरून पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अपराध क्रमांक १२५७/२०२६ कलम ३१८(४), ३(५) बि.एन.एस. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे करण्यात येत असतांना फिर्यादी यांनी घटनेवेळी आरोपीबाबत सांगितले प्रमाणे ए.टी.एम. मध्ये असलेल्या एका आरोपीबाबत माहीती प्राप्त केली असता, आरोपी नामे जमशेद अली शौकत अली, रा. जामा मस्जिद जवळ, बाबरी जिल्हा शामली, राज्य उत्तरप्रदेश हा असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याबाबत माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशा प्रमाणे एक पथक उत्तरप्रदेश राज्य येथे रवाना होवुन तेथे पोहचुन सदर आरोपीबाबत माहीती घेत असता तो घरी आला नसल्याची माहीती प्राप्त झाल्याने दि. १६/०९/२०२६ रोजी सदर आरोपीचा वर्धा परीसरात शोध घेत असता मिळालेल्या माहीतीप्रमाणे एक इसम हा त्याचे ताब्यातील विना कमांकाच्या पांढऱ्या रंगाचे टि.व्ही.एस. अपाची मोटर सायकल ने सेवाग्राम रेल्वे स्टेशन परीसरात संशईतरित्या फिरत असल्याबाबत माहीती प्राप्त झाल्याने सेवाग्राम रेल्वे स्टेशन परीसरात जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी माहीतीप्रमाणे जमशेद अली शौकत अली, वय ४५ वर्षे, रा. जामा मस्जिद जवळ, बाबरी जिल्हा शामली, राज्य उत्तरप्रदेश हा मिळुन आला. त्यास सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारले असता त्याने सदर गुन्हा हा त्याचा दुसरा साथीदार नामे सावेज अली, रा. गंगेरू जि. शामजी राज्य उत्तरप्रदेश याचेसह केल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन व अंगझडती मधुन १) भारतीय चलनाचे ५००/- रूपये मुल्याचे एकुण नगदी ४८,०००/-रू, २) घटनेवेळी वापरलेली एक पांढऱ्या रंगाची ज्यावर लाल रंगाचा पट्टा असलेली टि.व्ही.एस. अपाची

 कंम्पनीची विना क्रमांकाची मोटर सायकल कि. १,५०,०००/-रू, ३) एक काळया रंगाचे हेलमेट कि. १,०००/-रू, ४) एक कॅनरा बँकेचे व एक युनीयन बँकेचे ए.टी.एम. कार्ड कि. ००.००/- रू. असा एकुण १,९९,०००/- रूपये चा मुद्देमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करून आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी जमशेद अली शौकत अली, वय ४५ वर्षे, रा. जामा मस्जिद जवळ, बाबरी जिल्हा – शामली, राज्य उत्तरप्रदेश हा सदरचे गुन्हे करण्याचे सवईचा असुन त्याचेकडुन अशाप्रकारचे ईतरही जिल्हयात तसेच ईतर राज्यात सुध्दा केलेले गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो. उपनि. राहुल इटेकार, पो. उपनि, सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, भुषन निघोट, नरेंद्र पाराशर, धर्मेंद्र अकाली, विक्रम काळमेघ, अमोल नगराळे, मंगेश चावरे, गोविंद मुंडे, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, रितेश गेटमे, मिथुन जिचकार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये