पोलीस स्टेशन देवळी हददीतील सर्व गणपती मंडळाचा त्सुत्य उपक्रम (डि.जे./डॉल्बी सांउड व लेझर लाईटचा वापर न करण्याबाबतचे मंडळानी दिले हमीपत्र)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गणेशोत्सव दरम्यान ध्वनी प्रदुषण व प्रकाश प्रदुषणामुळे नागरीक, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले विदयार्थी तसेच आजारी व्यक्तीना त्रास होउ नये यासाठी पोलीस विभागाने गणेश मंडळांच्या पदाधिका-यांशी संवाद साधुन डि.जे./डॉल्बी सांउड व लेझर लाईटचा वापर न करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस स्टेशन देवळी हददीतील सर्व गणेश मंडळांनी डि.जे./डॉल्बी सांउड व लेड़ार लाईटचा वापर न करण्याबाबत लेखी हमीपत्र पोलीस विभागास दिले आहे. गणेश मंडळांनी घेतलेला निर्णय कायदा व सुव्यवस्था राखणे व ध्वनी प्रदुषण टाळणे, पर्यावरणाच्या संरक्षण करणे आणि नागरीकाच्या आरोग्याची काळजी घेणे या दृष्टीने महत्त्व पुर्ण आहे.
गणेशोत्सव हा श्रध्दा, भक्ती, सामाजिक एकोपा व सांस्कृतिक पंरपरेचा उत्सव असुन गणेशोत्सवाच्या माध्यमातुन सामाजिक जनजागृतीला चालना देण्याच्या उददेशाने वरीष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त झालेल्या सुचनेनुसार पोलीस स्टेशन देवळीच्या वतीने गणराया अवार्ड २०२६ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
पोलीस स्टेशन हददीतील सार्वजनिक गणेश मंडळामध्ये सुरक्षित, शिस्तबध्द, पर्यावरणपुरक व सामाजिक बांधीलकी जपणारा गणेशोत्सव साजरा व्हावा, या उददेशाने विवीध विषयांवर आधारीत उपक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाल गणेश मित्र मंडळ समिती, काळा मारोती मंदीर चौक देवळी यांचे वतीने दिनांक १८/०९/२०२६ रोजी सायंकाळ दरम्यान रस्ते सुरक्षा या विषयावर जनजागृतीच्या उददेशाने पथनाटय सादर करण्यात येणार आहे तसेच दिनांक १९/०९/२०२६ रोजी विविध आजारानंवर आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे व सायंकाळ दरम्यान एस.एन.जे. महाविघालय देवळी येथील एनसीसीच्या कॉडेट मार्फत सायबर सुरक्षीत गणेशोत्सव व अंमली पदार्थ विरोधी अभियान (नशेला नकार जिवनाला स्विकार) या विषयावर पथनाटयव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच दिनांक २१/०९/२०२६ रोजी शाळा व महाविघालयातील विदयार्थी कडुन व्यसनमुक्ती व पर्यावरण या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच दत्त मंदीर बाल गणेश मंडळ, लोकमान्य टिळक चौक देवळी यांचे वतीने दिनांक २१/०९/२०२६ रोजी आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले आहे व श्री. नवयुवक गणेश मंडळ, भिडी यांचे वतीने व्यसन मुक्ती बाबत देखावा तसेच चित्रकला स्पर्धा व वेगवेगळया विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात नागरीकांनीही पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद बाब किंवा कायदा व सुव्यवस्थेशी संबधीत माहीती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन अथवा आपातकालीन हेल्प लाईन ११२ वर संपर्क करावा.



