ग्रामपंचायत निमणी येथे राजुरा मुक्ती दिन उत्साहात साजरा
सशस्त्र सीमा बलाचे जवान राहुल सावरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्रामपंचायत निमणी येथे राजुरा मुक्ती दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सशस्त्र सीमा बलाचे जवान राहुल सावरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राजुरा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण केले.
यावेळी सरपंच अतुल धोटे, माजी उपसरपंच उमेश राजुरकर, ग्रामसेवक सुभाष सहारे, ग्रामपंचायत सदस्य अनिल कारेकर, कोतवाल इम्रान शेख, रामकृष्ण बंडेवार, श्रीराम टेकाम, रामदास गौरकर, स्वप्नील धोटे, प्रकाश गारघाटे, अनिल पिंपळशेंडे, संतोष गारघाटे प्रणय पिंपळशेंडे प्रफुल मोरे आदी उपस्थित होते.
राजुरा मुक्तिसंग्राम हा या परिसराच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असून, या संघर्षातून स्वातंत्र्य, लोकशाही आणि जनतेच्या हक्कांसाठी लढलेल्या वीरांचे स्मरण या दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. ग्रामपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी देशभक्तीपर वातावरणात राजुरा मुक्तिसंग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीने राजुरा मुक्तिसंग्रामाचा इतिहास जाणून घ्यावा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घ्यावी, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



