ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बर्गमॅन मोपेड चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेवुन अटक

एक बर्गमॅन मोपेड किंमत ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे सौ. चेतना किशोर भगत, वय ४५ वर्षे, रा. समतानगर वैशाली बुध्द विहाराजवळ, वर्धा यांनी दिनांक ०९/०९/२०२६ रोजी तकार दिली कि, दि. ०८/०९/२०२६ चे २०/०० वा. ते दि. ०९/०९/२०२६ चे १२/०० वा. चे दरम्यान त्यांचा मुलगा नामे तन्मय भगत याने घरासमोर ठेवलेली पांढऱ्या रंगाची बर्गमॅन मोपेड क. एमएच ३२ एटी. ७१३३ कि. ८०,०००/-रू. ची मोपेड कोनीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली अश्या तकार वरून पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अपराध कमांक १५२४/२०२६ कलम ३०३(२) वि.एन.एस. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे करण्यात येत असतांना अज्ञात आरोपीचा शोध घेनेकामी पो. स्टॉफ सह वर्धा उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना आरोपी नामे अक्षय प्रमोदराव फुलकरी, वय २५ वर्षे रा. वार्ड क. ०३ वायफळ ता. देवळी जि. वर्धा ह.मु. दिनेश सेलुकर यांचे घरी किरायाने मिलींदनगर सावंगी (मेघे) ता. जि. वर्धा हा तुकडोजी ग्राउंड साईनगर, वर्धा येथे चोरीस गेलेली पांढऱ्या रंगाची बर्गमॅन मोपेड कमाक एमएच. ३२ एटी. ७१३३ किमंत ८०,०००/- रूपये चा मुद्देमाल सह मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उपनि. राहुल इटेकार, पोलीस अंमलदार भुषन निघोट, धर्मेंद्र अकाली, अमोल नगराळे, मंगेश चावरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये