ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘डीसीएस एमएच’ भ्रमणध्वनी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना पीक नोंदणीची सुविधा

शेतकऱ्यांनी स्वतःच्या भ्रमणध्वनीवरून पिकांची अचूक नोंदणी करण्याचे शासनाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतः करता यावी, यासाठी केंद्र शासनाच्या ‘डीसीएस एमएच’ भ्रमणध्वनी प्रणालीमध्ये शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीची सुविधा ११ सप्टेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी ११ ऑगस्टपासून सहाय्यक स्तरावर पीक नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

पीक पाहणीची प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होण्यासोबतच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा वापर करून शेतकरी स्वतःच्या भ्रमणध्वनीवरून ‘डीसीएस एमएच’ प्रणालीमध्ये आपला शेतकरी ओळख क्रमांक टाकून शेतातील पिकांची नोंदणी करू शकणार आहेत.

शेतकऱ्यांनी विशेष बाब म्हणून लक्षात घ्यावे की, शेतकरी ओळख क्रमांकाशी जोडलेला भ्रमणध्वनी क्रमांक त्यांच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. त्याच क्रमांकावर एकवेळ वापरता येणारा संकेतांक प्राप्त होणार असल्याने जोडलेला क्रमांक उपलब्ध नसल्यास नोंदणी करता येणार नाही.

शेतकरी ओळख क्रमांकाशी संलग्न असलेल्या सर्व शेतजमिनींची पीक नोंदणी या सुविधेद्वारे करता येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक व वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. पीक नोंदणीची माहिती विविध शासकीय योजना, अनुदान तसेच इतर शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ‘डीसीएस एमएच’ भ्रमणध्वनी प्रणालीचा वापर करून आपल्या शेतातील पिकांची नोंदणी शक्य तितक्या लवकर करून घ्यावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पीक पाहणीची पद्धत समजून घेण्यासाठी संबंधित माहितीपटाची मदत घेता येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये