देऊळगाव राजा येथे धनावत परिवाराने श्री गणेश मूर्ती भोवती केली इको फ्रेंडली सजावट
"नावेमध्ये केली श्री गणेश स्थापना"

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे अंकुश धनावत व संचित यांच्या परिवाराने यावर्षी नावेमध्ये श्री गणेशाची स्थापना केली आहे, दरवर्षी धनावत परिवार वेगवेगळ्या संकल्पना घेऊन श्री गणेशाची सजावट करत असते, विशेष करून त्यामध्ये इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून वेगवेगळे देखावे स्वतःच्या मेहनतीने तयार करीत असतात त्यामुळे संपूर्ण परिवाराचा सहभाग त्यामध्ये असतो गेल्यावर्षी सुद्धा त्यांनी भारतीय संस्कृतीचा घर कसे असते याबद्दल इको फ्रेंडली देखावा तयार करायला केला होता.
तो आकर्षण बिंदू ठरला होता,यावर्षी मात्र त्यांनी आगळावेगळा उपक्रम केला आहे नावे मध्ये श्री गणपती बाप्पा विराजमान केले आहे समुद्रकिनारी असलेल्या नावे मध्ये श्री गणेश मूर्ती विराजमान झाली असून सभोवती समुद्रकिनाऱ्याचे रेखाटन केले आहे आपल्या कोळी बांधवांचे जीवन किती धाकधखीचे व निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे हे दर्शविले आहे, ऊन वारा वादळ पाऊस यांचा सामना करत कोळी बांधव दर्यामध्ये आपले कार्य करीत असतात कोकणामध्ये हा परिवार गेला असता त्यांना हे दृश्य दिसले व त्यावेळेस त्यांनी श्री गणेशाची स्थापना होडीमध्ये करू अशी संकल्पना मनात आणली व यावर्षी ती साकारली ही नाव किंवा होडी तयार करण्यासाठी त्यांनी बांबूंच्या कमट्याचा वापर केला असून त्याचबरोबर झाड कागदाची नाव तयार केली असून त्याला स्वतः रंगवले आहे त्याचबरोबर कागदी खोपटा व बांबूच्या काड्या चा वापर केला आहे शिळा साठी सुद्धा बांबूच्या व स्वतःच्या दोरीचा वापर केला आहे या परिवाराच्या सदस्य सौ रोशनी धन्यवाद यांच्या डोक्यात ही संकल्पना आली व सर्व परिवाराने यामध्ये सहभाग घेऊन हे नाव व सुंदर समुद्रकिनारा साकारला आहे.
त्या मध्ये दिसणारे कोळी बांधव नारळाची उंच झाडे व त्यामुळे विचरण करणारे पक्षी दिसत आहेत यासाठी सर्व वस्तू त्यांनी इको फ्रेंडली वापरल्या आहेत हा गणपती बाप्पा साप साकारण्यामध्ये सर्व धान्य बाबत परिवार सहभागी असून यामधील स्थापन केलेली श्री गणेशाची मूर्ती सुद्धा अत्यंत सुंदर मनमोहक व प्रसन्न आहे रोज भक्ती भावाने आरती पूजन या परिवाराकडून केले जाते व हात देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे आदरपूर्वक आगत स्वागत व प्रसाद वितरण या परिवाराकडून केले जाते त्यांच्या या इको फ्रेंडली गणपती बाप्पाला साष्टांग नमस्कार



