ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट रोजी डॉ. साळवे यांच्या बालरोग तज्ज्ञ दवाखान्यात श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. साळवे उपस्थित होते.

यावेळी शारदा खोब्रागडे, गेडाम मॅडम, पेटकर, मडावी साहेब, टिपले मॅडम, जवादे सर, रवि वानखेडे, प्रिती मैत्रेय, इंजिनीअर ठाकरे, भगतजी, शेंदरे मॅडम, सुरेखा ताई रामटेके, सुरदास खोब्रागडे, नामदेव रामटेके सर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकर यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी तसेच अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. साळवे यांनी डॉ. दाभोलकर यांच्या वैज्ञानिक, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचारसरणीवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव रामटेके सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शारदा खोब्रागडे यांनी केले.

मारेकऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये