ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑनलाइन हयात प्रमाणपत्र काढून घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना यांसह विविध अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी ऑनलाइन हयात प्रमाणपत्र (DLC) सादर करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी ऑनलाइन हयात प्रमाणपत्र काढलेले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

लाभार्थ्यांना ऑनलाइन हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच संबंधित गावातील तलाठी कार्यालय व ग्राम महसूल सेवक (कोतवाल) यांच्यामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत गावागावांत प्रसिद्धीही करण्यात आली आहे.

यापूर्वी हयात प्रमाणपत्र काढल्यानंतर ते तहसील कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता होती. मात्र, शासन स्तरावरून प्रक्रियेत बदल करण्यात आला असून लाभार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत ऑपरेटर किंवा ग्राम महसूल सेवक (कोतवाल) यांच्यामार्फत हयात प्रमाणपत्र काढून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अद्याप ऑनलाइन हयात प्रमाणपत्र काढलेले नाही अशा लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या ग्रामपंचायत ऑपरेटर कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्राम महसूल सेवक (कोतवाल) किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन तात्काळ ऑनलाइन हयात प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रमाणपत्र वेळेत काढून घेतल्यास अनुदान नियमित सुरू राहण्यास मदत होणार आहे.

यासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास तहसील कार्यालय, भद्रावती येथे संजय गांधी शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन भद्रावतीचे तहसीलदार संदीप गो. पानमंद यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये