ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे सद्भावना दिनानिमित्त सद्भावना प्रतिज्ञा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे **सद्भावना दिनानिमित्त सद्भावना प्रतिज्ञेचे आयोजन आज करण्यात आले. माजी पंतप्रधान **स्व. राजीव गांधी** यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी **जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा यांवर आधारित कोणताही भेदभाव न करता सर्व भारतीय जनतेमध्ये बंधुभाव, ऐक्य, भावनिक ऐक्य आणि सामाजिक सौहार्द वाढविण्यासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा** घेतली. तसेच मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय व संविधानिक मार्गाने सोडविण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी **प्रा. पवन चटारे** होते. कार्यक्रमाचे आयोजन **डॉ. मनोहर बांद्रे** यांनी केले. यावेळी **डॉ. संदीप घोडिले, प्रा. चेतन वैद्य** तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सद्भावना प्रतिज्ञा घेतली. सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता, शांतता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये