डॉ. एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारतभर ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्र. महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे दि. १२ आगष्ट रोजी त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए चंद्रमौली यांनी आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय हे विविध अभ्यासक्रमांच्या ग्रंथांनी समृद्ध असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयात यासोबतच विविध स्पर्धा परीक्षांची ग्रंथ सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच विविध मासिके, सी डी, विविध संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व आपले जीवन सफल करावे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा दिलीप सोनटक्के यांनी डॉ एस आर रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यानी आपल्या जीवनात ग्रंथालय शास्त्रात विविध प्रकारचे संशोधन करून ग्रंथालय शास्त्राचा पाया रोवन्यापासून तर त्याला बळकटी प्राप्त करण्याकरीता त्यानी आपले संपूर्ण आयुष्य कसे वाहून घेतले यांवर सखोल असे भाष्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील डॉ.उराडे, प्रा.वासाडे, प्रा.वताखेरे, डॉ.देशमुख, डॉ.बागडे, डॉ. मोडक, डॉ. मार्कंडेवार, डॉ वैराळे, डॉ.बडवाईक, डॉ. चौधरी, प्रा राऊत,प्रा.वाकडे, प्रा.शेंडे, प्रा.गुरुदेव,प्रा.शाह, प्रा.भसारकर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



