ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मूल येथे शिक्षकांचे १० दिवसीय ‘वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण’ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

     शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात सुधारणा आणि व्यावसायिक विकासाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले १० दिवसीय ‘वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण’ मूल येथे मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. हे प्रशिक्षण दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत स्वामी विवेकानंद विद्यालय मूल येथे संपन्न झाले.त्यात वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी असे मिळून एकूण १४७ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

       या प्रशिक्षणाच्या नियोजनात व यशस्वी अंमलबजावणीत पंचायत समिती मुल चे गटशिक्षणाधिकारी जयश्री गुज्जनवार यांचे मार्गदर्शनात पंचायत समिती, मूलचे विस्तार अधिकारी(शिक्षण)श्रीरंग कुमरे यांनी मुख्य भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे विविध टप्पे शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले.

    प्रशिक्षण कालावधीत तज्ज्ञ सुलभक म्हणून डॅनियल देवगडे, बाळू टिपले, विद्या कोसे,रश्मी गुरनुले,माधव मसराम,भास्कर चौधरी,रुपेश परसावार,बबिता चहांदे,विक्रांत रामटेके,श्वेता खोब्रागडे,माया झरकर,राहुल भगत,राजू बनसोड,राजेश अडगुरवार, विजया पिंपळकर यांनी कार्यभार सांभाळला त्यांनी

 प्रशिक्षणार्थी शिक्षकांना विविध शैक्षणिक संकल्पना, अध्यापन पद्धती, मूल्यमापन तंत्रे आणि आवश्यक बाबींवर सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातील सत्रांमध्ये सहभागी शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले अनुभव व विचार मांडले. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चंद्रशेखर प्यारमवार यांनी केले तर आभार प्रा.विशाखा करमनकर यांनी आणि प्रास्ताविक प्रा.विनोद बोलीवार यांनी केले.

   प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन घरोटे,केंद्र प्रमुख जीवन भोयर, शिक्षक जितेंद्र बल्की,पुरुषोत्तम मेश्राम,सचिन पुल्लावार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये