ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट पोलीसांकडून देहव्यवसाय करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

बरेच दिवसांपासुन हिंगणघाट शहरामध्ये काही महिला या देहव्यापार करीत असल्याबाबत गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली होती. दिनांक 19/11/2026 रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल राउत यांनी गोपणीय माहितीचे आधारे पोलीस स्टॉपसह हिंगणघाट शहरातील नंदोरीरोड लगत असलेल्या पंढरी नगरीमधील एका दुमजली ईमारतमध्ये देहव्यापार करणाऱ्या महिलांवर छापा टाकला. छापा दरम्याण एक पंटर ग्राहक तयार करून व त्याचे जवळ पैसे देवुन सदर महिलांकडे पाठविण्यात आले. सदर पंटर ग्राहकाजवळुन देह व्यापार करणाऱ्या महिलांनी 1000 रू. घेवुन त्यास एका महिलेसोबत रूममध्ये पाठविण्यात आले. याबाबत पंटर ग्राहकाने पोलीसांना ईशारा देताच पोलीसांनी सदर घरात छापा टाकुन दोन महिलांना देहव्यापार करतांना पकडले. त्यांचे ताब्यातुन पंटर ग्राहकांकडून घेतलेले 1000 रु. देह व्यापाराकरीता ईतर ग्राहकांकडून घेतलेले 1400 रू, सिलबंद कंडोम, व ग्राहकांशी संपर्क साधण्या करीता वापरलेला एक अॅन्ड्रॉइड मोबाईल असा एकुण 12440 रू. चा मुद्देमाल सदर दोन्ही महिलांकडून हस्तगत करून व त्यांना पुढील कारवाई करीता ताब्यात घेवुन त्यांचेवर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अनैतीक व्यापार प्रतिबंदक कायद्याचे कलम 3(1), 4, 5 (1) (ग) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि. अनिल राउत यांचे मार्गदर्शनात पो. हवा. प्रशांत ठोंबरे हे करीत आहे.

यांनी केली कारवाई :- सदर कारवाई हि मा. पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमर अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात पो. नि. अनिल राउत यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे नेमणुकीस असलेले पो.हवा. प्रशांत ठोंबरे, पो.हवा. किशोर कडू, पो.ना. राजेश शेंडे, पो.अं. विजय हारनुर, पो.अं. मंगेश वाघमारे, पो.अं. शुभम् गावंडे, महिला पोलीस कर्मचारी सिमा लोखंडे, अर्पणा डांगरे यांचे मदतीने केली…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये