ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई

गांजाची अवैध लागवड उघडय ५.७०४ किलो ओला गांजा जप्त, ८५,५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अमली पदार्थोंची अवैध लागवड, उत्पादन, विक्री व तस्करी यांना आळा घालण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. समाजातील तरुण पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात अडकू नये तसेच अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन देवळी हद्दीत पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

याच अनुषंगाने पोलीस स्टेशन देवळीच्या पथकाने कारवाई करीत गांजाच्या अवैध लागवडीसंदर्भात कारवाई केली. सदर कारवाईमध्ये आरोपी बळीराम दौलत शिवरकार, वय ५५ वर्षे, रा. पाचगाव (पुनर्वसन), ता. देवळी, जि. वर्धा याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

सदर प्रकरणात पोलिसांनी एकूण ५.७०४ किलो ग्रॅम ओला गांजा, अंदाजे किंमत ८५,५६० रुपये, असा अमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन देवळी येथे अप. क्र. ८८०/२०२६ कलम २० (अ), ८ (ब) NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे..

“गांजाचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक”

गांजा हा अमली पदार्थ असून त्याचे सेवन शरीर आणि मेंदूवर विपरीत परिणाम करू शकते. गांजाच्या सेवनामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णयक्षमता व विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सतत सेवन केल्याने व्यसनाधीनता निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच मानसिक अस्वस्थता, चिंता, नैराश्य, काही व्यक्तींमध्ये गंभीर मानसिक विकारांगा धोका वाढू शकतो.

गांजाच्या सेवनामुळे वाहन चालविताना प्रतिक्रिया देण्याची क्षमता व निर्णयक्षमता कमी होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते. तरुण वयात अमली पदार्थाचे सेवन सुरू झाल्यास शिक्षण, करिअर, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे क्षणिक आकर्षण किंवा मित्रांच्या आग्रहाखातर अशा पदार्थांचे सेवन करून स्वतः ये आयुष्य धोक्यात घालू नये.

“नागरिकांना देवळी पोलिसांचे आवाहन

आपल्या परिसरात गांजाची किंवा इतर अमली पदार्थांची अवैध लागवड होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

अमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती द्यावी.

पालकांनी आपल्या पाल्यांच्या मित्रपरिवाराकडे, वर्तनातील बदलांकडे व सवयींकडे लक्ष द्यावे.

युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, व्यायाम व सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा.

अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना केवळ दोष न देता त्यांना व्यसनमुक्ती उपचार व समुपदेशनासाठी प्रोत्साहित करावे.

अमली पदार्थमुक्त समाज ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या परिसरात अमली पदार्थांना थारा देऊ नका. अमली पदार्थाची अवैध लागवड, विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे.

“कारवाई करणारे पोलीस पथक”

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव बाधमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले, उपविभाग पुलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देवळीचे ठाणेदार श्री. संदीप कापडे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.

या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक मगरे, पोलीस हवालदार विनोद कांबळे, ब.नं. १२८०, पोहवा अमोल आलवडकर ब.नं. १४७०, पोहवा. निलेश तेलरधि ब.नं.६४०, पोहवा. गजानन महाकाळकर ब.नं.८८०, पोअ. आकाश कसर ब.न.९६५, पोअ. संतोष गिते ब.नं.१७११ यांनी सहभाग घेतला.

अंमली पदार्थांना नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये