गौरवी गुप्ता हिने नीट परीक्षेत ५१० गुण प्राप्त करुण एमबीबीएसला मिळविला प्रवेश
श्री कान्यकुब्ज वैश्य हलवाई हितकारणी संघातर्फे आवळा नवमीच्या पावन पर्वावर गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ नीट (NEET) २०२५ परीक्षेत ५१० गुण प्राप्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्याची उल्लेखनीय कामगिरी कु. गौरवी रीना रविशंकर गुप्ता हिने केली आहे. तिच्या या यशामुळे हलवाई समाजाची मान उंचावली असून, तिच्या शैक्षणिक कामगिरीचे समाजाच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
गौरवीने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत श्री कान्यकुब्ज वैश्य हलवाई हितकारणी संघ, नागपूर यांच्या वतीने आवळा नवमीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रिका प्रदान करून गौरविण्यात आले.
या सत्कार सोहळ्याला गौरवीचे मोठे बंधू उमाशंकर गुप्ता, मंजू गुप्ता, ओम गुप्ता, सीमा गुप्ता, राजकुमार गुप्ता यांच्यासह संघाचे स्वागताध्यक्ष रितेश गुप्ता, उपाध्यक्ष हर्षित गुप्ता, अशोक गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
गौरवीच्या या यशामुळे कुटुंबीयांसह हलवाई समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिची कामगिरी समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.



