ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अवैध दारू विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 21 नोव्हेंबर 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून वार्ड नं. 04 सेलु येथे आरोपी अमोल कैलाश मांढरे याचेवर दारूबंदी कायद्यान्वये प्रो.रेड केला असता, नमुद आरोपी हा तेथे हजर मिळुन आला असुन, त्याचे घराचे झडती दरम्यान 08 प्लास्टीक चुंगड्यांमध्ये देशी दारू व 01 प्लास्टीक चुंगडीमध्ये विदेशी दारू चा मुद्येमाल मिळुन आला. सदर दारूचा माल हा त्याने आरोपी अतुल वाघमारे रा. हिंगणी याचेकडुन खरेदी केला असुन, दोन्ही आरोपी हे संगणमताने त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता दारूविक्रीचा अवैध व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन 1) देशी दारू प्रिमीयम नं. 1 कंपनीच्या 90 एम.एल. च्या 800 सिलबंद शिशा, 2) विदेशी दारू ऑफिसर चॉईस कंपनीच्या 180 एम.एल. च्या 48 सिलबंद शिशा, 3) गुन्ह्यात वापरलेली एक मेटॅलिक ग्रे रंगाची होंडा अमेझ कार क्र. एम.एच. 49 ए.ई. 2032 जु.कि. 7,96,800 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सेलु येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, रवि पुरोहित सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये