ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विभाजन विभिषिका स्मृती दिन संपन्न

फाळणीच्या वेदनेचे स्मरण करून इतिहासातून धडा घेऊ - डॉ. पंकज मोहरीर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

चंद्रपूर :- १९४७ ची फाळणी ही केवळ भारताच्या राजकीय नकाशावर आखलेली सीमारेषा नव्हती, तर ती मानवी जीवनाला हादरवून टाकणारी एक शोकांतिका होती. तिची व्याप्ती मानवी विस्थापन, मानसिक आघात, सामाजिक विस्कळीतपणा आणि पिढ्यान्‌पिढ्या टिकून राहिलेल्या स्मृतींमध्ये दिसून येते. विभाजन विभीषिका स्मृती दिनी फाळणीच्या वेदनेचे स्मरण करून इतिहासातून धडा घेऊ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. पंकज मोहरीर यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘विभाजन विभिषिका स्मृती’ दिनाचे आयोजन सिपेट सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर होते, तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक हितेश नंदेश्वर, रासेयो कार्यक्रम अधिकारी राजू श्रीरामे आदींची उपस्थिती होती.

विषयांच्या अनुषंगाने प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केले तर संस्थेतील प्रशिक्षण संदर्भात सूचना गटनिदेशक हितेश नंदेश्वर यांनी दिल्यात.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य गजानन राजुरकर म्हणाले की, समाजातील विश्वास, बंधुभाव आणि मानवी मूल्ये नष्ट झाली, तर त्याची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते. वर्तमानातील सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि राष्ट्रनिष्ठेत करणे हेच नागरिक म्हणून आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

    सूत्रसंचालन उपकार्यक्रम अधिकारी अनिता ढेंगेकर यांनी तर आभार प्रदर्शन राजू श्रीरामे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी संस्थेतील निदेशक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये