ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठ सायकल स्नेही प्रा. विलास पारखी पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     गेल्या नऊ वर्षांपासून सायकल चालवा, आरोग्यवान व्हा, प्रदूषण टाळा हे विशेष अभियान राबविण्यात यशस्वी झालेल्या सायकल स्नेही मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विलासराव पारखी यांना पर्यावरणतज्ज्ञ दिवंगत विजय मार्कंडेवार स्मृती पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वसंत विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायकल स्नेही मंडळाचे संस्थापक ग्राम. बंडोपंत बोढेकर होते तर ज्येष्ठ पत्रकार अनिल धामोडे, सायकल स्नेही मंडळाचे सरचिटणीस उदय धकाते, वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कामडी यांची उपस्थिती होती.

   सदर पुरस्कार राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येतो. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, सायकल स्नेही तसेच सर्पमित्र म्हणून करून निसर्ग संवर्धनाचे काम उत्स्फुर्तपणे करणारे प्रा. पारखी हे सर्मपित व्यक्तीमत्व आहे, त्यांचा गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, अशी भावना यावेळी बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन मिरा बिसेन यांनी केले तर आभार प्रदर्शन उदय धकाते यांनी मानले. मुरलीधर दोनाडकर, प्रा. अरुण पालारपवार, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, प्रा. उल्हास आखाडे, उपेंद्र द्रोहणकर, डॉ. योगेश पाटील, प्रा. संतोष संगनवार, प्रा. ज्ञानेश्वर धकाते, माधुरी बागडे-बोरकर, श्री. विनायक साळवे , वैभव बारेकर, डॉ. शुभम मोंढे, सौ. प्रा. सुनिता विजय साळवे, भाविक ठक्कर, संजय आकरे, राजेंद्र गव्हारे , पंकज भोगेवार आदींनी प्रा. पारखी यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये