शरदराव पवार महाविद्यालयच्या वतीने स्वच्छता पंधरवाडा उपक्रम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदुर :_ स्थानिक शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवाडा निमित्त प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छतेचे महत्व , नशा मुक्त युवा- विकसित भारत या विषयावर स्वयंसेवकांनी जनजागृती पर रॅली काढली तसेच महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
तसेच स्वच्छता व नशा मुक्त युवा -विकसित भारत या संकल्पनेवर विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. या विषयावर जनजागृती करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.शरद बेलोरकर, डॉ. सतेंदर सिंग, एन. सी. सी. चे सी. पी. ओ.प्रा. मंगेश करंबे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी परिश्रम घेतले.



