ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवीन विद्युत वाहिनीचे कंडक्टर वायर चोरणारे ३ आरोपी जेरबंद ; २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

आष्टी पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आष्टी तालुक्यातील अंबिकापूर फाट्याजवळून नवीन उभारण्यात आलेल्या विद्युत वाहिनीचे ७०० मीटर कंडक्टर वायर चोरीला गेल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी जलद गतीने तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

गुन्ह्याची हकीकत याप्रमाणे आहे की, किशोर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे साईड इंजिनियर फिर्यादी राहुल चरणदास गजभिये वय ३७, रा. यशवंत बाबा कॉलनी, अमरावती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १४/०८/२०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास मौजा अंबिकापूर बस स्टॉपजवळ नवीन उभारण्यात आलेल्या विद्युत वाहिनीचे अंदाजे ७०० मीटर कंडक्टर वायर (किंमत ₹२९,०००/-) कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवल्याचे निदर्शनास आले. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आष्टी येथे अपराध क्रमांक २८२/२०२६, कलम ३०३(२), ३ (५) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये गुन्हा नोंदवून तपासात घेण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सचिन देवराव कांबळे वय ४८, रा. थार, आष्टी, दीपक विलासराव भोजने वय २९, रा. इंदिरानगर, आष्टी, मंगेश यशवंतराव कुडमेथे वय ३७, रा. थार, आष्टी यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला ₹२९,०००/- किमतीचा ७०० मीटर कंडक्टर वायर जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला.

सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन आष्टीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेश जोशी, पोलीस उपनिरीक्षक निलेश भिलावे, पोलिस अंमलदार सचिन सोनोने, सतीश नंदागवळी, वैभव साबळे, अमर ढाकूलकर कर व पवन देशमुख यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये