विठ्ठल मंदिर प्रभागात महापौर यांच्या हस्ते विकासकामाचा झंझावा
सौ. संगीता राजेंद्र खांडेकर हया नागरीकांच्या सेवेसाठी सदैव कटिबध्द

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- महानगरपालिका विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथे महापौरांच्या विशेष निधीअंतर्गत विविध ठिकाणी विकासकामाचे भूमीपूजन दि. १६.०८.२०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हयाचे प्रथम नागरीक महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, नगरसेवक भालचंद दानव, नगरसेविका सौ. किरण सचिन कोतपल्लीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन सोहळा आयोजित केला होता. या सोहळयाला प्रभागातील असंख्य पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या.
1) शेखर साखरकर ते शंकर गर्गेलवार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम 2) राजनूर हॉलच्या गेटपासून ग्लोबल चर्च पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम 3) गणेश चहारे ते राजू चहारे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम 4) सेंट फ्रान्सिस शाळेच्या मागे श्री लांजेवार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम 5) श्री. निळकंठ निखाडे यांच्या घरापासून ते श्री पारकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.
या विकासकामांमुळे नागरिकांना दर्जेदार व मजबूत रस्ते सुविधा उपलब्ध होऊन दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी महापौर यांच्या पुढाकारातून विविध विकासकामे सातत्याने राबविण्यात येत आहेत.
विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल!
नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध.



