ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हरवलेले सहा मोबाईल मूळ मालकांना स्वातंत्र्यदिनी परत

धाबा पोलिसांची यशस्वी कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा उप पोलीस स्टेशनचे नवे ठाणेदार हेमंत पवार यांनी आल्या आल्याच दमदार कामगिरी करत चोरीला गेलेल्या सहा मोबाईलचा शोध घेऊन स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट /ला मूळ मालकांना परत केले.

 वर्ष २०२५_२६ मध्ये सहा मोबाईल मालकांनी आपले मोबाईल तेलंगाना, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून चोरीला गेल्याची तक्रार धा बा उप पोलीस स्टेशनला दाखल केली होती. मोबाईलच्या CEIR पोर्टल द्वारे तेलंगाना, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या वेगवेगळ्या भागात मोबाईलचा शोध घेण्यात आला.

८० व्या स्वातंत्र्यदिनी पोलीस स्टेशनच्या आवारात मूळ मालकांना निमंत्रित करून अतुल चूनारकर ( हिवरा), गुरुदास कावळे ( डोंगरगाव), सुनील महाडोळे ( डोंगरगाव), दादाजी मडावी (कुडे नांदगाव), निखिल आत्राम (धाबा), सचिन आदे (गोजोली) यांचे प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल असा ९० हजाराचा मुद्देमाल धाबा पोलिसांनी ठाणेदार हेमंत पवार यांच्या नेतृत्वात तात्काळ प्रतिसाद देऊन ताब्यात घेतला.

 धाबा पोलिसांनी ही कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नो पाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनात केली. हरवलेले मोबाईल त्वरित परत करण्यात आल्याने मालकांनी समाधान व्यक्त केले.

 “नागरिकांनी आठवडी बाजारात जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी जात असताना मोबाईल वरच्या खिशात ठेवू नये. यामुळे मोबाईल चोरीला जाण्याची जास्त शक्यता असते. काळजी करूनही मोबाईलची चोरी झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या sancharsathi. in च्या CEIR प्रणाली वर तक्रार नोंदवावी. बिल नसलेले सेकंड हॅन्ड मोबाईल शक्यतो कोणाकडून खरेदी करू नये “

         हेमंत पवार, ठाणेदार, उप पोलीस स्टेशन धाबा*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये