ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृह व चांदा क्लब ग्राऊंड येथे

हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 80व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 07.30 वाजता चंद्रपूर जिल्हा कारागृहात स्वातंत्र्ययोध्दे, क्रांतिवीर पुलेसूर बाबुराव शेडमाके यांच्या शहीदस्थळावर ध्वजारोहण करून मानवंदना दिली.

याप्रसंगी राष्ट्रगीत गाऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करून स्वातंत्र्यदिनानिमित्त लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी हंसराज अहीर यांनी देशाच्या ऐक्य, अखंडता, व सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देत भारतीय स्वातंत्र्याला चिरायु करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सर्वश्री तपासे सर, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, शहीद बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे विठ्ठल कुमरे, विठ्ठल मसराम, गणेश गेडाम, अरविंद मडावी, कमलेश आत्राम, दिवाकर मेश्राम, भाऊराव जुमनाके, श्याम गेडाम, नत्थू गेडाम, रेखाताई मेश्राम, प्रतिभाताई आलाम, राजेंद्र खांडेकर, नगरसेवक भालचंद्र दानव, राजू घरोटे, विनोद शेरकी, प्रमोद शास्त्रकार, संजय खनके, विकास खटी, प्रदीप किरमे, सचिन कोतपल्लीवार, वंदनाताई संतोषवार, पूनम तिवारी, गौतम यादव, शालूताई कन्नोजवार,  बाळू कोलनकर, नकुल आचार्य, कार्तिक मुसळे, प्रसाद कातपाताळ, स्वप्नील मुन,  अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चांदा क्लब ग्राऊंड येथेही ध्वजारोहण केले व सर्वांना स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी बंधुभाव तसेच सहकार्याची भावना ठेऊन भारतवर्षाच्या प्रगतीसाठी झटावे असे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, डॉ. मेहरा जी, डॉ. देवईकर जी, विनोद दत्तात्रय जी, डॉ. सुशिल मुंधडा जी, डॉ. टिपणीस जी तसेच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये