ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता : सामाजिक कार्यकर्ते शंकर गुरर्या कॉलरेडी यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ सामाजिक कार्यकर्ते शंकर गुरर्या कॉलरेडी (वय ५०), रा. पिपरबोडी, यांचे दीर्घ आजाराने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पिपरबोडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शंकर कॉलरेडी हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नागरिकांच्या सुख-दुःखात सहभाग घेतला. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

गेल्या काही काळापासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी शोक व्यक्त केला.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी पिपरबोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये