ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आज सकाळी देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, पत्रकार प्रा अशोक डोईफोडे होते, सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शांतीलाल निरफळे, रमेश नरोडे, प्रा अशोक डोईफोडे, प्रकाश खांडेभराड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाला प्रकाश अहिरे, बाबुलाल शिवरकर, मधुकरराव धुळे, घनश्याम भंडारे, मार्तंड आप्पा घिके, रामदास कुलथे तथा इतर उपस्थित होते, याप्रसंगी प्रकाश खांडेभराड यांची देऊळगाव राजा तालुका माळी समाज संघटना च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबुलाल शिवरकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये